नेत्रदान करण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना :
- नेत्रदान करण्याचा संकल्प करा व तसेच इच्छापत्र भरून ठेवा.
- आपल्या या संकल्पाबद्दल कुटुंबीयांना माहिती द्या.
- इच्छापत्र जरी भरले नसले तरीही मृत्यूनंतर नातेवाईक नेत्रदान करू शकतात.
- मृत्यूनंतर जास्तीत जास्त सहा तासाच्या आत नेत्रपेढीशी संपर्क करा.
- मृत व्यक्तीचे दोन्ही डोळे बंद करा व त्यावर ओल्या कापसाचे बोळे ठेवा.
- रूममधील पंखा बंद करा.
- मृत व्यक्तीच्या डोक्याखाली उशी ठेवा.
- मृत व्यक्तीचे दोन फोटो व शक्य असल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र तयार ठेवा.